अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. चहापानाला गेलो असतो, तर महाराष्ट्रद्रोह झाला असता, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर केली होती. तर याला प्रत्युत्तर म्हणून एकनाथ शिंदेंनी देखील राष्ट्रद्रोह्यांबरोबर चहा पिण्याची वेळ टळली,” अशा शब्दांत हल्लाबोल केला. दरम्यान शिंदेंच्या या विधानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य करत, मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “सुभाषसिंग ठाकूर कोणाचा माणूस आहे, याचं उत्तर द्यावं,” असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे.
#EknathShinde #SharadPawar #JitendraAwhad #AjitPawar #NCP #MaharashtraAssembly #BudgetSession #SanjayRaut #UddhavThackeray #Congress #Shivsena #BJP #Mumbai #RajThackeray #MarathiBhashaDin #MNS #Maharashtra